सावंतवाडीला सुसंस्कृत व सामाजिक जाण असलेली माऊली नगराध्यक्षपदी बसणार…

रवी जाधव यांचा विश्वास: जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी..

⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी सामाजिक जाण असणारी, सुसंस्कृत व अनुभवी माऊली बसवली जाईल, असा विश्वास सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष, नगरसेवक आणि समाजसेवक हे जनसेवेचे प्रमुख आधारस्तंभ असून, जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मूलभूत सुविधा मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे, असे जाधव यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे महिलांना मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महिलांचे नेतृत्व दिसत आहे, असे ते म्हणाले.

जाधव पुढे म्हणाले, “जशी एक स्त्री आपले कुटुंब समतोल राखून सांभाळते, त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरही एका सुशिक्षित, सुसंस्कृत, अनुभवी आणि सामाजिक जाण असलेल्या माऊलीच्या हाती सुरक्षित आहे. ही माऊली निश्चितच प्रामाणिकपणे शहराचे प्रतिनिधित्व करेल याचा मला विश्वास आहे.”गेल्या चार वर्षांपासून रिकामी असलेली नगराध्यक्षपदाची खुर्ची आता शहरातील नागरिक आणि गोरगरीब व्यापाऱ्यांना न्याय देणारी ठरेल, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली.“सावंतवाडीची भूमी प्रत्येकाला प्रामाणिक परिश्रमाने प्रगती करण्याची संधी देते. योग्य पात्रता ज्याच्यात आहे त्याला कोणीही अडवू शकत नाही, हे या शहराचे वैशिष्ट्य आहे,” असे सांगत, निवडून येणाऱ्या माऊलीसह सर्व नगरसेवकांनी शहरात आनंद, समाधान आणि सुखाचे वातावरण निर्माण करावे, अशी विनंती त्यांनी केली.

You cannot copy content of this page