⚡मालवण ता.३०-:
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचा एनएसएस व एनसीसी विभागाच्या वतीने राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र ( एन सी सी आर) पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिवसाचे औचित्य साधून मालवण दांडी किनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानाची सुरुवात दांडेश्वर मंदिराच्या परिसरापासून अर्धा किलोमीटर पर्यतच्या परिसरापर्यंत राबविलेल्या या मोहिमेत १ टन प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आला
या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्वच्छता अभियानामध्ये मालवण नगरपरिषद आरोग्य विभाग श्री संजय पवार ,युथ बीट्स फॉर क्लायमेट ( मालवण) च्या अध्यक्ष कु. मेगल डिसोजा, दर्शन वेंगुर्लेकर, स्वाती पारकर, अक्षय रेवंडकर, ऐश्वर्य मांजरेकर, मनीषा पारकर ,चारुशीला देऊलकर, संजय वराडकर ,भार्गव खराडे, यतार्थ खवणेकर, माजी वनअधिकारी श्री सुभाष पुराणिक, कांदळवन विभाग परिमंडल वनअधिकारी मालवणचे श्री सत्यवान सुतार, मंडलधिकारी वेंगुर्लाचे श्री सुनील सावंत, यु एन डी पी चे केदार पालव आणि टीम, निलक्रांती (मालवण) च्या सोनाली परब, दांडी येथील श्री नारायण धुरी, प्रवीण कुबल, स्वप्निल गोसावी, सन्मेश परब, प्रसाद सामंत, अंजना सामंत, ऋषिकेश सामंत, दत्ताराम नेरकर, इकोमेट( मालवण) संस्थेचे पदाधिकारी तसेच श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) च्या एनसीसी ,आर्मी व नेव्ही विभागाचे डॉ. सचिन देशमुख, डॉ. विशाल अपराध, आर्मी गर्ल्स विभागाच्या डॉ. कविता तळेकर, एनएसएस विभागाचे समन्वयक डॉ. यु.सी पाटील, डॉ. सौ.सुनयना जाधव, प्रा एम बी बर्गे, प्रा. रोहन सावंत, प्रा.एम. व्ही भिसे, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. गणेश मर्गज, डॉ.शलाका वालावलकर, डॉ. रवीना गवस ,श्री शिवाजी राठोड, वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे एनसीसी , एन. एस. एस चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्वच्छता अभियानाचे समन्वयक डॉ. गणेश मर्गज यांनी प्रास्ताविक केले यावेळी युवराज लखमराजे भोंसले यांनी मालवणसारख्या समुद्र किनाऱ्याला वर्षभरामध्ये लाखो पर्यटक भेट देत असतात त्यामुळे येथील किनारे स्वच्छ ठेवणे ही पर्यटनाचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे स्पष्ट केले . माजी वनअधिकारी श्री सुभाष पुराणिक ,
एनसीसीचे डॉ. सचिन देशमुख, डॉ. कविता तळेकर, एनएसएस विभागाचे डॉ. यू.सी पाटील, डॉ. सुनयना जाधव यांनी या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले. युथ बीट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्ष कु. मेगल डिसुजा हिने आभार मानले. या स्वच्छता अभियाना मध्ये 80 लोक सहभागी झाले होते.
