⚡बांदा ता.२९-: येथील गांधी चौक सार्वजनिक नवरात्रोत्सव मित्रमंडळ बांदा यांच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवात यावर्षी भक्तिमय वातावरणात डबलबारी भजनांचा जंगी सामना रंगणार आहे. हा सामना आज सोमवार, दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता गांधी चौक, बांदा येथे पार पडणार असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या विशेष भजन सोहळ्यात श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ यांच्यातर्फे बुवा गुंडू सावंत सहभागी होणार असून त्यांना गुरुवर्य बुवा अशोक सावंत यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. पखवाजावर विराज बावकर तर तबल्यावर संकेत गोसावी साथ देणार आहेत.
तर दुसरीकडे महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, देवगड नाडण यांच्यातर्फे बुवा संदीप पुजारे सहभागी होणार असून त्यांना बुवा जयराम घाडी व बुवा विजय पुजारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पखवाजावर संकेत राऊत यांची साथ लाभेल.
या भक्तिरसात रंगणाऱ्या डबलबारी भजनाच्या जंगी सामना संजु परब व दत्ताराम उर्फ बाबा टोपले (भेडशी) यांनी पुरस्कृत केला आहे.
