⚡वैभववाडी ता.२८-: धनगर एस टी आरक्षण अमलबजावणीसाठी जालना येथे सुरू असणाऱ्या दीपकभाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाने पाठिंबा दिला असून एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा असे पत्र सोमवार दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना देण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपस्थित रहावे असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाची एसटी आरक्षण व जालना येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सभा एमआयडीसी कुडाळ येथे रविवारी पार पडली
यावेळी सुरेश झोरे संतोष बोडके कानू शेळके महादेव खरात विजय खरात विठ्ठल खरात, अंकुश जंगले, प्रभाकर बुट्टे प्रकाश खरात अमोल जंगले मंदार वरक, रमेश खरात,आधी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना येथे सुरू असणाऱ्या दीपकभाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाचा पाठिंबा…!
