तालुका केमिस्ट-ड्रगिस्ट असो. तर्फे ग्रामीण रुग्णालयाला साहित्य भेट…

⚡मालवण ता.२८-:
जागतिक फार्मासिस्ट दिवस मालवण तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने साजरा करण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात मालवण तालुका असोसिएशनच्यावतीने ग्रामीण रुग्णालयाला एक पल्स ऑक्सिमीटर, दोन डिजिटल ब्लड प्रेशर मशीन, दोन नेबुलाइझर मशीन देण्यात आल्या.

यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय पोळ, डॉ. बालाजी पाटील यांचा सत्कार तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शेखर सुपल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी छोटू तारी, दत्तात्रय पारथिये, ढोलम, राहुल कुळकर्णी, सिद्धेश आचरेकर, अमेय पारकर, विशाल आचरेकर, प्रथमेश कोळगे तसेच इतर सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला तालुक्यातील केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते

You cannot copy content of this page