Headlines

आचरा रस्ता मोरी मंजूर

निधी प्राप्त होताच काम सुरु;कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता ०७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा रस्त्यावरील माेरीची दुरुस्ती करण्यासाठी २ लाख ७० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तरी हा निधी प्राप्त हाेताच दुरुस्ती चे काम हाती घेण्यात येईल अशी माहिती बांधकाम कार्यकारी अभियन्ता अनामिका जाधव यांनी बांधकाम समिती सभेत दिली. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाईन संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य प्रदिप नारकर, रेश्मा सावंत, श्रीया सावंत आदि उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा रस्त्यावरील माेरी नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती करण्यात यावी. याबाबत बांधकाम समिती सदस्य जेराॅन फर्नांडिस यांनी सभागृहाचे लक्ष् वेधले हाेते. याबाबत तेथील मोरीची पाहणी करून २ लाख ७० हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तरी हा निधी प्राप्त हाेताच दुरुस्ती चे काम हाती घेण्यात येईल असे सभेत सांगण्यात आले. तसेच बांदिवडे येथील बंधाऱ्याचे काम अपूर्ण असल्याने तेथील आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱ्या च्या जमिनीचे माेठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याबाबत जेराॅन फर्नांडिस यांनी मागील सभेत सांगितले होते. यावर याविषयी चा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सभेत सांगितले. देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी शाळा निर्लेखित झाली असतानाही नवीन शाळा बांधकाम यादीत शाळेचे नाव नसल्याची बाब सदस्य प्रदीप नारकर , यांनी मागील बांधकाम समिती सभेत उघड केली हाेती . शिक्षण विभागाने प्राधान्यक्रम ठरवून दिलेल्या यादीत या शाळेचे नाव होते . मात्र सभापती दालनातून जेव्हा यादी बाहेर पडली तेव्हा या शाळेचे नाव वगळण्यात आले असल्याचा आरोप केला होता. तसेच नागरिक आणि विद्यार्थांवर अन्याय झालेला सहन करणार नसल्याचे सांगत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही नारकर यांनी बांधकाम समिती सभेत दिला हाेता . या इशा-याकडे लक्ष देत शिक्षणाधिकारी एकनाथ आंबाेकर यांनी देवगड तालुक्यातील नाद भोळेवाडी येथील निर्लेखित झालेल्या शाळेचे काम मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. याबाबत ची माहिती सदस्य प्रदिप नारकर यांनी सभेत दिली. मात्र मागील सभेत झालेली चर्चा आणि मी केलेल्या सूचना आजच्या सभेत का आल्या नाहीत.असा प्रश्न प्रदीप नारकर यांनी उपस्तित केला.यावर नजर चुकीने या सूचना राहुन गेल्याचे सांगण्यात आले. तसेच फणसगाव येथील बुरंमबावडे शाळा देखील निर्लेखित करण्यात आली होती. ही फणसगाव येथील बुरंमबावडे शाळा देखील प्राधान्याने पुढच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबाेकर यांनी सांगितले असल्याचे सदस्य प्रदिप नारकर यांनी सभेत बोलताना सांगितले. बांधकाम समिती आॅनलाईन सभेला किती खातेप्रमुख हजर आहेत. अशी विचारणा नारकर यांनी केली. या प्रमुख सभेला खातेप्रमुख येत नाहीत हे माेठे दुर्दैव आहे, तरी जे अधिकारी उपस्तित नाहीत त्याना समज द्यावी. अन्यथा आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा नारकर यांनी सभेत दिला.

You cannot copy content of this page