नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने जपली सामाजिक बांधिलकी

कोरोना रुग्णाच्या सेवेसाठी जिल्हा रुग्णालयला दिली ऑक्सिजनची दोन व्हॉल्व युनिट

सिंधुदुर्गनगरी ता ०७ कोरोना रुग्ण प्रचंड संख्येने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला गरज लक्षात घेत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने सामाजिक बांधिलकी जपत ऑक्सिजन फाईन आडजेस्टमेन्ट व्हॉल्व्हची दोन युनिट युनियनच्या कणकवली शाखेमार्फत देण्यात आली . कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्यसेवाही अपुऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे आज मदतीची गरज आहे अनेक लोक वेगवेगळ्या माध्यमातून मदतही करीत आहेत. त्याच अनुषंगाने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉ वेणू नायर याच्या आदर्शाची वाटचाल करीत युनियनच्या कणकवली शाखेचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ रमाकांत नाडकर्णी यांनी युनियनच्यावतीने जिल्हा रुग्णालयाममध्ये जाऊन जिल्हा रुग्णालयाचे औषध भांडार विभागाचे प्रमुख अनिलकुमार देसाई यांच्या जवळ ऑक्सिजन व्हॉल्व्हचे दोन युनिट सुपूर्द केले.

You cannot copy content of this page