अपंग निधी योजनेत तालुक्याना समान न्याय

सभापती अंकुश जाधव यांची ग्वाही

सिंधुदुर्गनगरी ता ०७ जिल्ह्यातील अपंग लाभार्थ्यांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून अग्रक्रमाचे लाभार्थ्यांना लाभ दिले जातील तसेच कार्यवाही करताना तालुक्यांना समान न्याय दिला जाईल. अशी ग्वाही समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी शुक्रवारी झालेल्या समाजकल्याण समितीच्या सभेत दिली. जिल्हा परिषद समाज कल्याण समिती सभा ऑनलाईन पध्दतीने समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज सम्पन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण , सदस्य संजय पडते ,अजिंक्य पाताडे,आदीसह खाते प्रमुख उपस्तित होते. आजच्या सभेत सदस्य संजय पड़ते यानी अपंग लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करताना प्रत्येक तालुक्याला समान न्याय द्यावा अशी मागणी केली. याबाबत बोलताना अंकुश जाधव म्हणाले या सूचनेप्रमाणे सर्व तालुक्यांना समान न्याय देऊन कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. समाजकल्याण विभागाकडील अन्य योजनांच्या प्रस्तावामध्ये अद्यापही काही त्रुटी तसेच अपूर्ण प्रस्ताव आहेत . त्याची पूर्तता सर्व संबंधित अधिकारी व लाभार्थ्यांनी करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले. लाभार्थींचे प्रस्ताव तात्काळ मंजूर होण्याच्या दृष्टीने आगामी स्थायी समितीची सभा होईल त्यात कार्योत्तर मान्यता घेतली जाईल. या कामांची प्रशासकीय मान्यता घेऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होतील . असा प्रयत्न करण्यात येईल असेही सभापतींनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page