Headlines

आरवली वेतोबाचा वाढदिवस सोहळा होणार साध्या पद्धतीने साजरा

*💫वेंगुर्ले दि.०७-:* आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबाचा वार्षिक वाढदिवस सोहळा वैशाख शु. पञ्चमी शके १९४३ सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी संपन्न होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमानेच चालू वर्षी ही हा वाढदिवस सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रम करून श्री देव वेतोबा चे live दर्शन इंटरनेट द्वारे सर्व भक्तांना घरबसल्या मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत अशी माहिती आरवली श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री जयवंत बाबुराव राय यांनी दिली. कोरोना महामारी असल्यामुळे प्रशासन स्तरावरून धार्मिक स्थळावरील बंदी जाहीर झाल्यामुळे आरवली मध्ये वेतोबा देवाचां वाढदिवस सोहळा साजरा करण्यावर मर्यादा येत आहेत. चालुवर्षी म्हणजेच सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी श्री देव वेतोबाच्या पुनः प्रतिष्ठा सोहळ्यास पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. आणि हा रौप्यमोत्सवी वाढदिवस सोहळा भव्यदिव्य स्वरूपात साजरा करावा अशी आमची सर्वांची मनोमन इच्छा होती. परंतु कोरोना रुपी जागतिक महामारिमुळे ही इच्छा चालू वर्षी पूर्णत्वास जात नसल्याने आम्हास खूप वाईट वाटत आहे. तरी सुद्धा त्यादिवशी थोडक्यात धार्मिक कार्यक्रम करून साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व भक्तांनी घरी बसूनच सुरक्षित राहून श्री देव वेतोबा चे दर्शन घेऊया आणि या भूतलावर सुख, शांती आणि समाधान नांदावे अशी श्री देव वेतोबा चरणी प्रार्थना करूया असे आवाहन अध्यक्ष श्री राय यांनी केले आहे.

You cannot copy content of this page