पथविक्रेत्यांनी पीएम-स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा-: गौरी पाटील…!

⚡कणकवली ता.२१-: पथविक्रेते, लघुउद्योजक आणि कुटुंबांना अधिक काळासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) योजनेचा कर्जकालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढविला आहे. शहरातील सर्व फेरीवाले – भाजी, फळ, मच्छी, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच हातगाडीधारक – यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या सुधारणांनुसार—

पहिला टप्पा : कर्ज मर्यादा ₹१०,००० वरून ₹१५,०००

दुसरा टप्पा : कर्ज मर्यादा ₹२०,००० वरून ₹२५,०००

तिसरा टप्पा : कर्ज मर्यादा ₹५०,०००

वेळेवर हप्ता परत करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय लिंक्ड रुपे क्रेडिट कार्ड दिले जाणार असून अचानक उद्भवणाऱ्या व्यवसाय वा वैयक्तिक गरजांसाठी ते उपयोगी ठरणार आहे. तसेच डिजिटल व्यवहारांवर १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची सुविधा देखील आहे.

ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘जनकल्याण मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page