सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातिल लसीकरण केंद्राबाहेर उभारला स्वखर्चातून मंडप..

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पुढाकार

💫 *सावंतवाडी दि.०७-:* सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसह ४५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनाही लसीकरण करण्यात येत आहे. लसीचा पहिला डोस या ठिकाणी दिला जात असून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी स्वखर्चातून मंडप उभारत त्यांची सोय केली. यामुळे लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हापासून होणारा त्रास कमी होणार आहे तसेच स्पीकरची व्यवस्था केल्यानं लसीकरण करण्यास सोयीस्कर ठरणार आहे. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग देखील राखलं जाणार आहे. रूपेश राऊळ यांनी केलेल्या सोयीबद्दल लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page