तर….गोव्याकडून सिंधुदुर्गाला ऑक्सिजन पुरवठा…

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आमदार दीपक केसरकर यांची माहिती

*💫सावंतवाडी दि.०८-:* जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण ऑक्सिजन पुरवठ्यासाठी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही आवश्यकता भासल्यास सिंधुदुर्गला ऑक्सीजन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन प्रेस घेऊन दिली आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यासाठी ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर पाठवले असून, आज किंवा उद्या हे सिलेंडर जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर सद्य परिस्थितीत लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, ही गर्दी कमी करण्यासाठी दोन लसीकरण करण्यात येतील. यामध्ये प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालयात वृध्द आणि ४५ वर्षांवरील लोकांनाच लसीकरण केले जाण्याची सोय केली जाणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तसेच गोव्यातून नेहमी येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी स्वतः विलगीकरण राहत, कुटुंबात मिसळू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याचवेळी त्यानी सावंतवाडी शहरातील पाणी प्रश्नांवर बोलताना सांगितले की, नगरपालिकेची सकारात्मक चर्चा झाली असून, कोणतेही राजकारण न करता तीन दिवस आड करून पाणी दिले जाणार आहे. तसेच मायनिग मधून आलेल्या विकासाच्या निधीतून सबंधित गावांना पाणी पुरवठा साठी आपण निधी देणार असल्याचे पण त्यांनी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page