नवीन ६९ रुग्ण मिळाले:डॉ कर्तस्कर यांची माहिती
*💫दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून ६९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रमेश कर्तस्कर यांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दोडामार्ग वासियांनी आज पासून सुरु करण्यात आलेल्या “जनता कर्फ्यू” ला उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान महाराष्ट्र गोवा सीमेवर कडक तपासणी तर शहरातील मुख्य बाजारपेठेत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोडामार्ग शहरात येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी सुरू आहे.आमदार दीपक केसरकर व प्रशासनाकडून केलेल्या आवाहनानंतर दोडामार्ग मध्ये आज पासून कडक जनता कर्फ्यू पाळण्यात आला.आज पासून १५ मे पर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.तालुक्यातील मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद आहेत.
