सावंतवाडी कॉंग्रेसने केली कोरोना रुग्णाना फळ वाटप…

*💫सावंतवाडी दि.०७-:* कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोव्हिड सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या रुग्णाचे हाल होत होते. ही बाब कॉंग्रेस पक्षाच्या लक्षात येताच सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या वतीने आज उपजिल्हा रुग्णालय व कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना फळे व बिस्कीटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, समीर भाट, राजेश चितारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page