समुद्रकिनारी खडकात अडकून पडलेल्या बैलाची सुटका…

⚡मालवण ता.१८-:
मालवण येथील चिवला बीच कुरण परिसरातील समुद्र किनाऱ्यावरवरील खडकात पाय घसरून एक बैल पडल्याची घटना घडली. याविषयी माहिती मिळताच मालवण मधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू करत जेसीबीच्या सहाय्याने व स्थानिकांच्या मदतीने बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

बैल खोल खडकात अडकलेला असल्याने त्याला बाहेर काढणे अवघड होते. भर पावसातही विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाचे सेवा कार्य सुरूच होते. या मोहिमेत जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, मालवण संयोजक गणेश चव्हाण व गोरक्षक पार्थ डीचवलकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून मदतीस धाव घेतली. या बचाव मोहिमेत प्रसाद हळदणकर, स्वप्नील घाडी, ललित चव्हाण, उत्कर्ष मांजरेकर (धुरीवाडा ग्रामस्थ), विशाल गोवेकर, चेतक पराडकर, शेखर खोरजे, महेंद्र माणगावकर, प्रेम वेंगुर्लेकर, यश घाडीगावकर, मालवण नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री. पवार, स्वच्छता मुकादम श्री. वळंजू यांचे सहकार्य लाभले तसेच जेसीबी चालकाचे मोलाचे योगदान मिळाले.

यावेळी माजी नगरसेवक यतीन खोत व त्यांचे सहकारी अल्पेश वराडकर देखील उपस्थित होते. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बैलाची यशस्वी सुटका झाली. स्थानिक नागरिकांनी बजरंग दलाच्या या तत्परतेचे व सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

You cannot copy content of this page