भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

सिंधुदुर्गनगरी ता १७
बोधगया मंदिर कायदा १९४९रद्द करून जगभरातील बौद्धांसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन आज भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले या मागणीकड़े लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले .

अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा १९४९ रद्द करावा, महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे.महू जन्मभूमी स्मारक तसेच नागपुर दीक्षाभुमी याचे व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या ताब्यात द्यावे . या मागणीसाठी गेले वर्षभर देशभरात आंदोलन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आज १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील बौद्धांच्या विविध संघटना एकत्र येत, भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले . या आंदोलनात बहुसंख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते.

बिहारमध्ये जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगया आहे. बोधगया हे बौद्ध धर्माच्या चार पवित्र स्थळांपैकी एक आहे. जिथे भगवान बुद्धांना दुःखमुक्तीचे दिव्य ज्ञान प्राप्त झाले. बोधगया येथील महाबोधी महावीहार हे भारताबरोबरच जगभरातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मात्र जगभरातील बौद्धांसाठी वंदनीय असणाऱ्या पवित्र स्थळावर सध्या ब्राह्मणांचा कब्जा आहे. सन १९४९ च्या बोधगया टेम्पल कायद्यातील बोधगया महाविहार व्यवस्थापन समितीच्या रचनेबाबतच्या अन्यायकारक तरतुदीमुळे महाबोधी महाविहार या बौद्धांच्या पवित्र स्थळावर ब्राह्मणांनी कब्जा मिळवला आहे. त्यांच्या कब्जातून हे पवित्र स्थळ मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात मिळावे. तसेच महू भीम जन्मभूमी स्मारक आणि नागपुर येथील दीक्षाभुमी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या ताब्यात द्यावे .यासाठी आज जिल्ह्यातील विविध संघटना एकवटल्या असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले . वआपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले . बौद्ध संघटनाचे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यामध्ये आनंद कासार्डेकर ,संदीप कदम, सुषमा हरकुळकर सुदीप कांबळे, ममता जाधव,
आदि सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page