मालवण तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे यश…

⚡मालवण ता.१७-:
मालवण वायरी भुतनाथ येथील रेकोबा हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्ट्याच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले

या स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले तर १४ वर्षाखालील मुलींचा संघ तृतीय क्रमांक आणि १४वर्षाखालील मुलगे तृतीय क्रमांक तसेच १९ वर्षाखालील मुलगे या संघाने उपविजेतेपद पटकाविले याच हायस्कूलने १९ वर्षाखालील मुलीं तृतीय क्रमांक पटकाविले

या विद्यार्थ्यांना क्रीडा विभाग प्रमुख श्री.संजय पेंडूरकर, क्रीडाशिक्षक श्री. किसन हडलगेकर व श्री. भूषण गावडे तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व खो- खो खेळाडू बंडू सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर, सचिव श्री.सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई,शालेय समितीचे अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे , पर्यवेक्षक श्री महेश भाट तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page