मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा सल्ला
*💫कुडाळ दि.०७-:* आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नुसतेच फौजफाटा घेऊन पाहणी दौरे घेऊन, आरोग्य यंत्रणेला वेठीस धरू नये असा जोरदार टोला आमदार वैभव नाईक यांना मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात त्यांनी असे म्हटले आहे की खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी ८ महिन्यांपूर्वी येत्या २ महिन्यात महिला व बाल रुग्णालय सुरू करू असे जाहीर करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपये आणण्यासाठी कमी का पडले असा प्रश्न उपस्थित केला आहे. जनता कर्फ्यु चा आडून प्रशासनामार्फत सर्व सामान्य जनतेच्या पोटावर लाथ मरण्यापेक्षा आपल्या सरकारकडून लसीकरणासाठी पुरेसा लसीचा पुरवठा, ऑक्सिजन, चाचणी किट आदी बाबीचा पुरवठा करून, जनतेला या महामारीच्या काळात सहकार्य करावे असे आवाहन कुणाल किनळेकर यांनी केले आहे.
