मालवण ग्रामीण रुग्णालयात ४१० लस उपलब्ध

२५० कोविशिल्ड, १६० कोव्हेक्सिन

मालवण : (प्रतिनिधी) मालवण ग्रामीण रुग्णालयात ४१० कोविड लस साठा उपलब्ध झाला आहे. यात कोविशिल्ड २५०, कोव्हाक्सीन १६० लस आहेत. शुक्रवारी मामा वरेरकर नाट्यगृहात १८ ते ४४ वयोगटातील ज्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे व ज्यांना ७ मे रोजी ज्या वेळेत मालवण केंद्रावर लसीकरण बाबत उपस्थित राहण्याचा मेसेज आला त्यांनी त्याच वेळेत उपस्थित रहावे. अन्य कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे.

You cannot copy content of this page