जंगली हत्तीची दहशत आता ग्रामीण भागात…

मोर्ले गावात थेट वस्तीत दाखल हत्ती कळपाने भीतीचे वातावरण;वन विभागाचा निष्काळजीपणा

*💫दोडामार्ग दि.०७सुमित दळवी-:* दोडामार्ग वन क्षेत्रपाल तसेच वन कर्मचारी यांच्या निष्काळजीपणा मुळे जंगली हत्ती कळपाची दहशत आता ग्रामिण भागात वाढत चालली आहे. या कळपातील टस्कर हत्ती लोकांच्या अंगावर पाठलाग करून येऊ लागल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी राञी मोर्ले गावात चक्क लोकवस्ती जवळ दाखल झालेल्या या कळपाने मोठी दहशत माजवली गावात आलेल्या कळपाने फणसाच्या झाडाला धरलेले फणस खायला सुरुवात केली. यावेळी हाकलायल गेलेल्या गावातील युवक यांचा टस्कर हत्ती यांने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण वन विभाग यांचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता त्यामुळे हत्ती गावातील युवक असा तीन तास संघर्ष सुरू होता. अखेर राञी दिड वाजता हत्ती गावातून बाहेर काढून जंगलाच्या दिशेने हाकलून दिले. हेवाळे गावातील विजघर घाटीवडे, बांबर्डे, खराडे सोनावल, गावात धुमाकूळ घालून नुकसान केलेल्या जंगली हत्ती कळपाने बुधवारी रात्री आपला मोर्चा मोर्ले गावात वळवला.गावातील घराशेजारी असलेल्या फणसाच्या झाडाला धरलेले फणस यांना लक्ष केले त्यामुळे गावात हत्ती आले हे समजताच गावातील युवक हातात बॅटरी घेऊन त्यांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील युवक ग्रामस्थ गोपाळ गवस, यशवंत गवस, अजित गवस, अविनाश चिरमुरे,ज्ञानेश्वर चिरमुरे, राहुल गवस, अंकुश चिरमुरे, बाळा देसाई, बबलू नाईक,बाळा गवस, वैभव गवस, पांडुरंग चिरमुरे, तुषार देसाई,यांनी जंगली हत्ती यांना हुसकावून लावण्यासाठी पुढे सरसावले तोच टस्कर हत्ती माघारी फिरुन युवकांच्या अंगावर धावण्याचा प्रयत्न केला. युवकांनी घाबरून तेथून पळ काढली

You cannot copy content of this page