मालवण व्यापारी, मत्स्य व आंबा व्यावसायिकांचा निर्णय
मालवण : (प्रतिनिधी) मालवण शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने शहरात आठ दिवसांचा कर्फ्यु लावण्याबाबत मालवण नगरपालिकेत आयोजित बैठकीत व्यापारी, मत्स्य विक्रेते, आंबा व्यावसायिक यांच्याकडून “कर्फ्यु नको, नियम पाळू” असा सूर उमटल्याने मालवणात कर्फ्यु न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, त्यासाठी काही उपाययोजना राबविण्यात येतील, नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे प्रशासनातर्फ़े नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पष्ट केले. मालवणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी मालवण तहसीलदार कार्यालय येथे झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत जनता कर्फ्यु बाबत बैठक घेऊन निर्णय घ्या, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मालवण नगरपालिका सभागृहात गुरुवारी दुपारी १२ वाजता तातडीची बैठक बोलवली होती. या बैठकीला नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगरसेवक सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी, यतीन खोत, आपा लुडबे, नगरसेविका पूज करलकर, दर्शना कासवकर, शिला गिरकर, पूजा सरकारे, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेट्ये, मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, नाना पारकर, मच्छीमार प्रतिनिधी दिलीप घारे, बाबी जोगी, मत्स्य विक्रेत्या मनीषा जाधव, मच्छीमार सोसायटीचे विकी चोपडेकर, विजय केनवडेकर, दादा वाघ, मसऊद मेमन, मोहन वराडकर, आदी व इतर व्यापारी, व्यावसायिक, मच्छीमार उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी शहरात कर्फ्यु लावणे गरजेचे असल्याबाबत शहरातील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना सुदेश आचरेकर यांनी शहरात कोरोनाची स्वरूप घातक झाले आहे. शहरात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही नोंद नाही, त्यांना विलगीकरणात ठेवले जात नाही, चाकरमान्यांच्या येण्याने संसर्ग वाढला आहे, शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने कडक पावले उचलली पाहिजे होती, असे सांगितले. नगरसेवक आपा लुडबे यांनी आंबा व्यावसायिकांची बाजू मांडताना सात – आठ दिवस सर्व काही बंद ठेवल्यास आंबा व्यावसायिकांचे नुकसान होईल, आंबा हा नाशवंत असल्याने तो इतके दिवस टिकवून ठेवू शकत नाही, त्यामुळे कर्फ्यु नको. प्रशासनाने आजपर्यंत दुर्लक्ष केले म्हणूनच संसर्ग वाढला आहे, बाजार उघडतो म्हणून संसर्ग वाढतो हा समज चुकीचा असून कर्फ्यु पेक्षा शासनाच्या नियमांचे पालन करूया असे सांगितले. मच्छीमारांतर्फे बाबी जोगी व दिलीप घारे, विकी चोपडेकर यांनी मे महिना हा मच्छीमारी हंगामातील शेवटचा महिना असून पावसाळ्यात चार महिने मच्छीमारी बंद असणार आहे, कर्फ्यु लागल्यास काही दिवसच मच्छीमारांच्या हाती राहणार आहेत, तरी सर्वानुमते कर्फ्युचा लावण्याचा निर्णय झाल्यास त्यास मच्छीमारांचा पाठिंबा राहील असे सांगितले. तर मत्स्य विक्रेत्या मनीषा जाधव यांनी कर्फ्यु लागल्यास मच्छीमार महिलांनी करायचे काय? गेल्या वर्षी लॉकडाऊन मुळे मत्स्य विक्रेत्या महिलांनी मोठी नुकसानी झेलली आहे. वादळ नुकसानीची मदतही अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे आम्हाला पुन्हा लॉकडाऊन मान्य नाही असे सांगितले. व्यापाऱ्यांची भूमिका मांडताना नितीन तायशेटे यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालावधीत कर्फ्यु लावण्यात येत आहे. यामुळे कोरोनाची साखळी तुटणार नाही. कर्फ्यु लावायचा असल्यास तो संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी लावला पाहिजे, त्या अनुषंगाने एकाच कालावधीत जिल्हा बंद ठेवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, असे सांगितले. तर विजय केनवडेकर यांनी नियमांचे पालन करून दिलेल्या ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी आधीच घेतला आहे. कर्फ्यु बाबतचा सर्वसमावेशक निर्णय प्रशासनाने घ्यावा, व्यापारी संघाने वेळोवेळी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. आरटीपीसीआर टेस्ट चे रिपोर्ट चार दिवसांनी येत असल्याने या चार दिवसात टेस्ट करणारी व्यक्ती सर्वत्र फिरत आहे. अशा एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या चार दिवसातील फिरण्याने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो, त्यामुळे टेस्ट करणाऱ्या व्यक्तींना आचारसंहिता लावण्यात यावी, टेस्ट केलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने यंत्रणा सक्षम करावी असे सांगितले. कोरोना विषाणू आपले स्वरूप सतत बदलत असून वेगाने फैलाव होत आहे. यामुळे परिस्थिती खूप गंभीर बनली असून मालवण शहरात देखील बिकट अवस्था निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्ये
