कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणार…

आ नाईक यांची माहिती महिला बाल रुग्णालयातील रुग्णाशी केली चर्चा

*💫कुडाळ दि.०६-:* कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी स्वतः भेट देऊन कोविड वॉर्डची बाहेरून पाहणी केली. या रुग्णालयातील मेडिकल स्टाफशी चर्चा करत कोविड रुग्णांची विचारपूस केली. तसेच अडचणी जाणून घेतल्या. लवकरच याठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा आ. वैभव नाईक यांनी तपासला. त्याचप्रमाणे कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या इतर आवश्यक सोयी सुविधांबद्दल विचारपूस केली.रुग्णालयाची साफसफाई, रुग्णांना लागणारा औषध पुरवठा, आवश्यक वस्तूंचा आढावा आ. वैभव नाईक यांनी घेतला. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, रुपेश पावसकर, राजू गवंडे, अधिपरिचारिका शर्मिला धुरी वालावलकर यांसह स्टाफ नर्स उपस्थितीत होत्या.

You cannot copy content of this page