रतांब्याच्या झाडावरुन पडून वायरी भूतनाथ येथील एकाचा मृत्यु…

*💫मालवण दि०६-:* रतांब्याच्या झाडावरून खाली कोसळून वायरी भूतनाथ उभाटकरवाडी येथील संभाजी शांताराम तावडे (५२) यांचा सकाळी मृत्यू झाला याबाबतची खबर शेजारी राहणाऱ्या अजित परुळेकर यांनी मालवण पोलीस स्थानकात दिली. संभाजी तावडे हे सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घरानजीकच्या रतांब्याच्या झाडावर रतांबे काढण्यासाठी गेले होते फांदीवरून त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले स्थानिक नागरिकांनी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

You cannot copy content of this page