बांदा-वाफोली मार्गावर झाड कोसळले…

गणेश मंदिराजवळ अपघात; काही काळ वाहतूक ठप्प..

बांदा/प्रतिनिधी
बांदा-वाफोली रस्त्यावर गणेश मंदिराजवळ शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. अवजड वाहनाची धडक बसल्याने रस्त्यावरील झाडाची मोठी फांदी कोसळली.
झाड कोसळताच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र धडक बसलेल्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत रस्त्यावर पडलेली फांदी बाजूला करण्याचे काम सुरू केले. काही वेळानंतर झाड हटवण्यात आले व वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. या अपघातामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तथापि, ग्रामस्थांच्या तात्काळ प्रयत्नांमुळे मोठी हानी टळली.
फोटो:-
वाफोली येथे रस्त्यावर झाड कोसळले.

You cannot copy content of this page