सावंतवाडी शहरातील सफाई कामगारांना पगार न मिळाल्याने १५ रोजी उपोषण करणार…

बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक संपन्न..

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सुमारे ६० कंत्राटी सफाई कामगारांना गौरी-गणपतीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुमारे तीन वर्षांचा पीएफ थकीत असताना, एक महिन्याचा पगार देण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले गेले होते. मात्र, तेही पाळले गेले नाही. या बेभरवशी आणि निष्काळजी कारभाराविरोधात, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

सावंतवाडी शहरातील गुरुकुल येथे आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक झाली. या बैठकीत माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, अभय पंडित, मनोज घाटकर, इफ्तिकार राजगुरू, बंड्या तोरसेकर, उमेश खटावकर, सुंदर गावडे, जॉनी फर्नांडिस, कामगार प्रतिनिधी बाबू बरागडे, सागर खोरागडे, विनोद काष्टे, बाबू कदम, कृष्णा डोईफोडे,लवू लाटये, सचिन कदम,सोहेब शेख, शब्बीर नाईक,राजू मयेकर, नितीन पोखरे,रवी कदम यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते.

You cannot copy content of this page