⚡मालवण ता.०९-:
आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्स वर कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू राहिल्याने संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर काल सायंकाळ नंतर मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेध टेमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडक कारवाई करीत मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरील समुद्रात अकरा वावाच्या आत मध्ये बेकायदेशीर मच्छीमारी करणाऱ्या रत्नागिरीचे तीन पर्ससीन ट्रॉलस पकडले काल पारंपरिक मच्छिमारांचे नेते बाबी जोगी यांनी मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छिमारी सुरु असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती पकडण्यात आलेले ट्रॉलर्सवर बांगडा व तसस्म मासळी आढळून आली आहे
मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मच्छिमारी करणारे रत्नागिरी चे तीन ट्रॉलर्स पकडले…
