⚡मालवण ता.०३-:
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक महासंघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने देण्यात येणारा सिंधुदुर्ग जि. प. माजी अध्यक्षा सौ. सरोज शिवाजी परब पुरस्कृत आदर्श शिक्षिका पुरस्कार मालवण येथील एस. एस. कुडाळकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची प्रशांत परब यांना जाहीर करण्यात आला आहे. तर संघटनेच्या वतीने देण्यात येणारा कै. योगेश विनायक कसालकर स्मृती सौ. विनया विनायक कसालकर पुरस्कृत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार एम. एम. परुळेकर प्राथमिक शाळा मालवणच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. श्रद्धा हरेश चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. महावस्त्र, श्रीफळ, पुष्प करंडक, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तसेच कै. रामचंद्र भगवान चौकेकर स्मरणार्थ श्री. गणपत रामचंद्र चौकेकर पुरस्कृत आदर्श शाळा पुरस्कार खाजगी प्राथमिक शाळा आंबेगाव म्हारकाटेवाडी तालुका सावंतवाडी या शाळेला देण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. संघटना हे सर्व पुरस्कार गेल्या वीस वर्षांपासून देत आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्वांचे संघटनेचे अध्यक्ष श्री. गणपत चौकेकर व सचिव श्री. राजन नार्वेकर आणि सौ. दर्शना गुळवे,श्री. शांताराम जंगले, श्री. प्रदीप सावंत, श्री. सचिन तुळसुलकर, श्री. तुषार गोसावी आदींनी अभिनंदन केले आहे.
