सावंतवाडीत 12 मे रोजी रक्तदान शिबिर…

*सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

*💫सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै. सभागृहाच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी रक्तदान करण्यास इच्छुक असलेल्या युवकांनी पुढील क्रमांकावर संपर्क करून प्रथम नाव नोंदणी करावी. जेणेकरून रक्तदान करतेवेळी त्या ठिकाणी गर्दी होणार नाही असे आवाहन केले आहे. सद्या राज्यात १८ ते ४४ वयोगटातील युवकांना लसीकरण सुरू करण्यात आले असून, या वयोगटातील युवकांनी लस घेतल्यानंतर ते ६० दिवस रक्तदान करू शकत नाहीत. त्यामुळे पुढील काळात राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देव्या सूर्याजी – 9922088238, अनिकेत पाटणकर – 8600741742, मेहर पडते – 9765727025, मंगेश तळवणेकर – 9421269444, जतिन भिसे – 9423513171, प्रसन्ना राणे – 9405278696, प्रवीण मांजरेकर – 9421190302, रामचंद्र कुडाळकर – 9763717761. या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page