मान्सून 1 जून रोजी केरळात,…

*_▪️हवामान विभागाचा अंदाज,_*

*💫मुंबई दि.०६-:* सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

You cannot copy content of this page