वेंगुर्ला: भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज वेंगुर्ले येथे झंझावाती दौरा करत घरघुती गणेशांचे दर्शन घेतले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या भजनी मंडळाला त्यांनी श्री गणेश पूजेचे साहित्य भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न देसाई, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासहित भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , प्रकाश वाघ , संजय लोनकर , समीर नाईक , अरविंद आळवे , शेखर आळवे , बाबुराव गावडे , सुधीर गवस , दिगंबर दळवी , अर्जुन राऊळ , नंदा सावंत , योगेश शिंगाडे उपस्थित होते .
विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना गणपती पुजा साहित्य भेट…!
