⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी येथे शेकडो अंधबांधवांना व गरजूंना आज माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणीकर यांनी शिधा वाटप केले.
यात तेल, तुरडाळ, साखर, गुळ, वाटाणे व अगरबत्ती वाटप करण्यात आले. यावेळी कारिवडे गावचे पुरोहीत समीर भिडे उपस्थित होते.
सन 1989 मध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख असल्यापासून मंगेश तळवणेकर यांनी गणेश चतुर्थीला कारिवडे गावातून दरवर्षी शिधावाटप करण्यास सुरुवात केली होती. आता वेगवेगळ¬ा गरजूंना शिधावाटप केले.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र, कोकण विभाग अध्यक्ष बाबुराव गावडे, सेक्रेटरी महेश आळवे व शेकडो अंधबांधव व गरजू उपस्थित होते. यासाठी विठ्ठल मंदिराची जागा विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष अॅड.दिलीप नार्वेकर यांचे आभार मानण्यात आले.तर उद्या सोमवार व मंगळवार या दिवशी आमच्याकडील यादीप्रमाणे इतर भागातील गरजूंना घरपोच शिधावाटप करण्यात येईल.