⚡बांदा ता.२४-: बांदा-पानवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शशिकांत पित्रे, माजी सरपंच बाळा आकेरकर, प्रभाग क्रमांक चारचे ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, माजी उपसरपंच राजाराम सावंत, सौ. दीपलक्ष्मी सावंत, बूथ अध्यक्ष नीलू देसाई, सौ. कविता मांजरेकर, शिक्षिका श्रीमती कदम, सौ. डेगवेकर, युवा मोर्चाचे भरत धारगळकर आदी उपस्थित होते.
फोटो:-
बांदा-पानवळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना भाजपा पदाधिकारी.