⚡सावंतवाडी ता.२१-: माठेवाडा येथील रस्त्यावर भलं मोठं भगदाड पडल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती काही नागरिकांनी या संदर्भात भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांचे लक्ष वेधतात त्याने तात्काळ याची दखल घेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विभागाचे घातले तसेच या संदर्भात आवश्यक ती उपायोजना करण्यासाठी नव्याने टेंडर काढून सदरचे काम मार्गी लावण्याची मागणी केली.
याबाबत आडिवरेकर यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “हे काम मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे. मी ती पूर्ण जबाबदारीने पार पाडेन.” त्यांच्या या तत्परतेमुळे संभाव्य अपघात टळला असून लवकरच या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे.
