⚡सावंतवाडी ता.१९-: स्वाभिमानी कुठलंही काम हाती घेतल्यावर ते तडीस नेणे हा स्वभाव मैत्रीला जागणे कोणीही काहीही सांगू त्याच्या मदतीला साथ देणे हा स्वभाव सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे. समाजकारण राजकारण दातृत्व अंगी असलेले असे उमदे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब. आमच्या हक्काचा संजू अशी सहज हाक युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात घर करणारे असे हे व्यक्तिमत्व. आमदार निलेश राणे यांचा विश्वासू मित्र कार्यकर्ता अशी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनल कडून घेण्यात आला हा धावता आढावा.
शिवसेना पक्ष गावागावात अधिकबळकट करण्याच्या दृष्टीने. त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी सोपवली आणि ही जबाबदारी त्यांनी गेल्या काही महिन्यात सिद्धही करून दाखवली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ते आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पक्ष वाढीचे कार्य सुरू आहे.खर तर शिवसेना या चार अक्षरात खूप काही सामावलं आहे. शिवसेना पक्षातून सैनिक म्हणून राजकारणात प्रवेश केलेले संजू परब यांची राजकीय सामाजिक क्षेत्रातील उंची वाखाण्या जोगी आहे. वडील जगन्नाथ परब यांचा वारसा समाजकारण राजकारणातला पुढे नेत त्यांनी ग्रामीण भागातील लोकांची आपलेपणाने वागण्याची त्यांची हातोटी खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणूनच आज गेल्या दोन दशकात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.सावंतवाडी शहरात ते लहानाचे मोठे झाले शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालय शिक्षणापर्यंत त्यांनी सावंतवाडी. आपला मित्र परिवार असा निर्माण केला . आज ते राजकीय पटलावर काम करताना याच मित्र मंडळांच्या सहकार्यामुळेच ते सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकले त्यात सर्वात वाटा असेल तर त्यांच्या मैत्रीला जागणाऱ्या गुणामुळेच. एकदा काही मैत्री केली की ते उत्तम निभावणे हा त्यांचा स्वभाव. सर्वांना हवाहवासा वाटणार हे नेतृत्व आहे. सावंतवाडी खासकीलवाडा. येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख पद ही त्यांच्या राजकारणाची सुरुवात. त्यानंतर कधी मागे वळून पाहण्याची वेळच आली नाही.आमदार निलेश राणे जेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एन्ट्री केली तेव्हा पहिल्यांदा संजू परब यांची ओळख झाली आणि तेव्हापासून आजतागायत म्हणजे गेली दोन दशके आमदार निलेश राणे आणि संजू परब यांची मैत्री जीवाभावासारखी आहे. आणि हीच मैत्री जपत. संजू परब यांच्यावर सर्वप्रथम युवक काँग्रेसची जबाबदारी सोपवण्यात आली ही जबाबदारी उत्तमपणे पार पाडली आणि काँग्रेसची युवकांची फळी जिल्ह्यात नव्हे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण केली पक्षश्रेष्ठींचा लक्ष वेधून घेतले काँग्रेस पक्षानंतर आमदार निलेश राणे यांच्यासोबत स्वाभिमान पक्षात प्रवेश केला स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पद ही धुरा सांभाळली त्यानंतर भाजप पक्षात प्रवेश केला आणि भाजप पक्षात सावंतवाडी नगरपालिकेवर पहिला भाजपचा झेंडा फडकवला तो नगराध्यक्ष यांच्या रूपात. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे हे शिवसेना पक्षात प्रवेश केला. आपले राजकीय गुरू आमदार निलेश राणे जेथे जातील तेथे मी असं सांगत सर्वप्रथम आमदार निलेश राणे यांच्यासोबत सर्वप्रथम पहिले शिलेदार म्हणून संजू परब यांनी शिवधनुष्य हाती घेतले. आता त्यांच्यावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची धुरा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून हे पद मिळाल्यापासून शिवसेना पक्ष वाढीबरोबर सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या समस्या अडचणी सोडवणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे काम ते सातत्याने करत आहेत आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची धुरा उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. आता होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ंमध्ये शिवसेना पक्षाला आणि महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी आपली कंबर कसली आहे. प्रत्येक गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे त्यांना शासनाच्या विविध योजना सांगून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी काम हाती घेतले आहे. त्यांचा एकच ध्येय स्वाभिमानी निष्ठेने दिलेली जबाबदारी पार पाडणे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे. आपल्या भागातील जनतेचा सर्वांगीण विकास आपल्या हातून होणे यासाठी नेहमी त्यांची तळमळीने काम करण्याची वृत्ती खरोखरच सामाजिक दातृत्व भावनेतून ते करत आहेत म्हणून सर्वांच्या मनातलं असे हे व्यक्तिमत्त्व आहे. सावंतवाडी शहरात नगराध्यक्ष असताना शहराच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी काम केले आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरासह विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात सर्वांच्या मनातलं असं हे व्यक्तिमत्व म्हणजे संजू परब. त्यांचा आज 19 ऑगस्टला वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्ताने ग्लोबल महाराष्ट्रात परिवाराकडून संजू परब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
