मडूरेत टपरीवजा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले…

सात हजारांची रोकड लंपास..

बांदा : प्रतिनिधी
मडुरा – रेखवाडी येथील दत्ताराम कोरगावकर यांच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री चोरी केली. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७ हजार रुपयांची रोकड आणि काही वस्तू लंपास केल्या. या चोरी प्रकरणाची नोंद बांदा पोलिसात नसल्याचे सांगण्यात आले.

मडूरा रेखावाडी येथे श्री. कोरगावकर यांचे घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर टपरीवजा दुकान आहे. ​सोमवारी सकाळी कोरगावकर हे दुकान उघडायला गेल्यावर चोरी झाल्याची बाब स्पष्ट झाली. रात्रीच्या मुसळधार पावसाची संधी साधून चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने कुलूप तोडून ड्रॉवर मधील रोकड लंपास केली.

सध्या गणेश चतुर्थीच्या काळात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय फेरीवाले गावात फिरत आहेत. या काळात अशा प्रकारच्या घटना वाढतात. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. ​या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

You cannot copy content of this page