⚡मालवण ता.१७-:
भारतीय जनता पार्टीच्या वतीने मालवण येथील धुरीवाडा पाटकर शाळेमध्ये विद्यार्थांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर व माजी नगरसेविका दर्शना कासवकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणवेश वाटप करण्यात आले, अशी माहिती माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, पुजा करलकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, भाई कासवकर, प्रमोद करलकर, संजय कासवकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, साईनाथ यांसह शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.
