कुडाळमध्ये उद्यापासून ‘आम्ही आत्मनिर्भर’ प्रदर्शन…

गणेशोत्सवानिमित्त नर्मदाआई संस्थेच्या वतीने आयोजन..

कुडाळ : दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. दि.१५, १६, १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ९ या वेळात महालक्ष्मी हॉल, पंचायत समिती नजीक येथे हे प्रदर्शन होणार आहे, अशी माहिती नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. तेरसे यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला उद्योजिका आणि व्यवसायिक, विषेशत: घरातूनच आपला व्यवसाय करणाऱ्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आम्ही नर्मदाआईच्या माध्यमातून गेली काही वर्ष सातत्याने करत आहोत. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी आणि स्थानिक उद्योजकांकडून उत्तम दर्जा, विश्वासार्हता, तसेच रास्त दर याची खात्री देत स्थानिक व्यवसायिक व ग्राहक दोघांचाही फायदा व्हावा हाच या महोत्सवाचा उद्देश आहे. या महोत्सवास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ. संध्या तेरसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

You cannot copy content of this page