⚡वेंगुर्ला ता.०८-: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि अखिल भारतीय शिक्षा समागम समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वेंगुर्ला येथील उपजिल्हा रूग्णालयात विशेष मोहिम अंतर्गत तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिर घेण्यात आले.
हे शिबिर सर्व शिक्षा अभियानांतर्गत घेण्यात आले असून यात उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संदिप सावंत यांनी मुलांना मार्गदर्शन केले. उपस्थित मुलांची नेत्र तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच डोळ्यांचे आजार व काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नेत्र तपासणी तज्ज्ञ डॉ. मंदार निळकंठ, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ.सुप्रिया रावळ, डॉ.भगवान मुंडे, आरोग्यसेविका संजना मोचेमाडकर, औषध निर्माता तनुश्री नाईक यांच्यासह सर्व शिक्षा अभियानाचे श्री.कावले, श्री.सरवदे, श्रीमती तांडेल, सर्वेश राऊळ, सारिका किनळेकर, श्री.गुच्छलवार आदी उपस्थित होते.
फोटोओळी-तालुकास्तरीय वैद्यकीय मूल्यांकन शिबिरात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
