⚡बांदा ता.०५-:
कै. गुरुवर्य दिगंबर उर्फ बाळू गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्गाचा गुरुवंदना कार्यक्रम बांदा येथ उत्साहात संपन्न झाला. यावेळी वर्गाच्या शिष्यांनी विविध अभंग, नाट्यगीत, भावगीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
श्री विठ्ठल मंदिर बांदा येथे संपन्न झालेल्या या गुरुवंदना कार्यक्रमाचे उद् घाटन गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगांवकर, जेष्ठ पत्रकार उमेश गाड, मोपा माऊली मंडळाचे अध्यक्ष सत्यवान नाईक, बांदा ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, निवृत्त कृषी सहाय्यक बाबली गाड, गायक अरुणदत्त परब, ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन, सगुणदादा सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गवस, मंडळाचे अध्यक्ष सिताराम गावडे, उपाध्यक्ष सुशांत नाईक, सचिव राजेश सावंत उपस्थित होते.
यावेळी नारायण मोरजकर यांनी गणेश वंदना सादर केली. बांद्यातील प्रदीर्घ भजन सेवेबद्दल गिरीश महाजन, पुरस्कार विजेते पत्रकार उमेश गाड तसेच संगीत वर्गाचे गुरु गुरुदास गांवकर यांचा क्लासतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी ऊर्वी देसाई, परी देसाई, निधी धारगळकर, संगीता येडवे, दिनेश नाईक, गोविंद राणे, विष्णू सावळ, संतोष सावंत, प्रकाश चव्हाण, आशुतोष भांगले, प्रवीण परब, अरुणदत्त परब यांनी विविध गीते, अभंग, सरगम गीतांचे सादरीकरण केले. त्यांना सुशांत नाईक, गुरुदास गांवकर, आत्माराम रेडकर यांनी हार्मोनियम तर दिनेश परब, राजेश रेडकर, किशोर तेली यांनी तबला व संदेश देसाई यांनी टाळ साथसंगत केली.रसिकांच्या आग्रहास्तव गिरीकाका महाजन यांनी भक्तिगीत सादर केले. गुरुदास गांवकर यांच्या भैरवीने सोहळ्याची सांगता झाली.यावेळी विद्यार्थी वर्गाने गुरुपुजन केले.
आरंभी कै. दिगंबर गाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या क्लासच्या माध्यमातून कै. गाडसरांचे नाव सदैव स्मृतीत राहील अशी भावना सर्वांनी व्यक्त केली. यावेळी क्लासचे संस्थापक कै. दिगंबर गाड यांच्या विविध आठवणींना पत्रकार उमेश गाड यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाला रत्नागिरीच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विनया परब, आसावरी गाड, स्वरदा गाड, सुनील नाटेकर, निलेश मोरजकर, नंदू बांदेकर, क्रांती मोपकर, अरुण नाईक, लक्ष्मण सावळ, उमेश मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल तेली, प्रवीण गाड आदींसह संगीत प्रेमी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना मोरजकर यांनी तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन आशुतोष भांगले यांनी केले.
फोटो – (श्री बांदेश्वर संगीत वर्गाच्या गुरुवंदना सोहळ्याचे उद् घाटन करताना मान्यवर )