जिल्हास्तरीय शालेय क्रीडा कीक बॉक्सिं स्पर्धेत बांदा येथील विद्यार्थ्यांच घवघवीत यश…!

⚡बांदा ता.०५-: जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कीक बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात बांदा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धा ओरोस क्रीडा संकुल येथे नुकतीच संपन्न झाली. जवळपास या विद्यार्थ्यांनी एकूण १५ पदके या क्रीडा प्रकारात मिळवली. यामध्ये प्रेरणा भोसले या विद्यार्थ्यांनीला सुवर्णपदक मिळाले.
खेमराज हायस्कूलच्या प्रांगणात हे विद्यार्थी प्रशिक्षक कीरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page