कुडाळ मनसेचा बांधकाम विभागाला इशारा:पंधरा दिवसात खड्डे बुजविण्याची मागणी..
⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवावे, अशी मागणी मनसे कुडाळ तालुक्याच्या वतीने बांधकाम विभागाकडे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांनी केली आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी बांधकाम विभागाकडे दिले. पंधरा दिवसात खड्डे बुजवले नाही तर बांधकाम विभागा समोर घंटानाद आंदोलन करू असा इशाराच मनसे तर्फे देण्यात आला आहे.
कुडाळ तालुक्यातील मालवण रस्ता, पिंगुळी संत राऊळ महाराज मठ रस्ता हे व इतर प्रमुख रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेश चतुर्थी पूर्वी बुजविण्यात यावेत, यासाठी बांधकाम विभाग कुडाळ यांना भेटून मनसेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात ठेकेदारांनी केलेले रस्ते जोखीम कालावधीमध्ये आहेत त्यांना लेखी सूचना देऊन खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेले बांधकामचे अधिकारी यांनी गणेश चतुर्थीपूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन मनसैनिकांना दिले. यावर पुढील पंधरा ते वीस दिवसात खड्डे न बुजवल्यास मनसेतर्फे बांधकाम कार्यालय कुडाळ येथे घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देताना उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी, वाहतूक सेनेचे विजय जांभळे, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर तथा राजवर्धेकर आदी उपस्थित होते.