⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुका खरेदी विक्री संघाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कुडाळ तालुका खरेदी विक्री संघामध्ये आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी खरेदी विक्री संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, संचालक संजय पडते, निलेश तेंडोलकर, विनायक अणावकर तसेच उपनेते संजय आंग्रे, सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, व्यवस्थापक करावडे आदी उपस्थित होते.
यावेळी खरेदी विक्री संघाच्या संचालकांनी खत पुरवठा भात बियाणे पुरवठा संदर्भात आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, खरेदी-विक्री संघाच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला निश्चित सांगा, असे सांगितले.
आम. निलेश राणे यांची कुडाळ खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट…
