महिलेचा फोटो काढणाऱ्या परप्रांतीय नागरिकाला चोप..

रविवारी सायंकाळी मालवण येथील घटना

*💫मालवण -:* मालवण येथे एका महिलेचा मोबाईलवरून फोटो काढणाऱ्या एका परप्रांतीय युवकाला येथील नागरिकांनी यथेच्छ चोप दिल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मालवण येथे शासकीय काम सुरू असलेल्या ठिकाणी एक परप्रांतीय युवक येथील महिलेचा फोटो मोबाईलवर काढत होता. हा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्याची विचारणा करून मोबाईलची तपासणी केली असता महिलेचा फोटो आढळून आला. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत मालवण पोलिसांच्या स्वाधीन केल्याची चर्चा असून याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत मालवण पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती

You cannot copy content of this page