⚡बांदा ता.०६-:
प. पू. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज स्थापित श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे गुरुवार दिनांक १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी १२ ते १.३० वाजता आरती आणि होमहवन, दुपारी १. ३० ते सायंकाळी ४ पर्यंत महाप्रसाद भंडारा, संध्याकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत भजन आणि हरिपाठ, रात्री ८ ते ९. ३० वाजेपर्यंत आरती आणि पालखी प्रदक्षिणा होणार आहे. स्वामी भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठातर्फे करण्यात आले आहे.
डोंगरपाल-डिंगणे येथे गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन…
