दिव्य ज्योती:प्रशाळेची शिक्षक पालक सभा शाळेच्या सभागृहात संपन्न..
⚡बांदा ता.०६-: दिव्यज्योती प्रशाला नावाप्रमाणेच दिव्यत्वाच्या ज्ञानरूपी ज्योतीने विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या प्रकाशवाटा दाखवत आहे. विद्यार्थ्यांना केवळ डॉक्टर, इंजिनियर बनवून पैसा कामवायला शिकवणे हे आमचे ध्येय नव्हे, तर एक माणूस म्हणून प्रत्येक विद्यार्थी घडावा, मानवता, परस्पर सहकार्य आदी मूल्यांची रूजवण योग्य वयात त्यांच्या मनावर व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असल्याचे प्रतिपादन दिव्य ज्योती प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन यांनी येथे केले. दिव्य ज्योती प्रशालेच्या पहिल्या शिक्षक पालक सभेत ते बोलत होते.
प्रशाळेची शिक्षक पालक सभा शाळेच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रॉबिन, व्यवस्थापक फादर लिजो आदी उपस्थित होते. प्रार्थनेने सभेची सुरवात झाली. प्रशालेच्या शिक्षिका अन्सा फर्नांडिस यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील उपक्रमांचे अहवाल वाचन केले. यावर्षी विद्यार्थ्यांसाठी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची पालकांना माहिती देण्यात आली. प्रशाळेची बस सेवा, डिजिटल क्लास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
यावर्षी शिक्षक पालक संघाच्या अध्यक्षपदी शैलेश केसरकर, तर उपाध्यक्ष पदी सौ. संतोषी धुरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेसाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 'सकाळ'च्या एनआयई या शैक्षणिक अंकाची माहिती वितरण प्रतिनिधी गुरुनाथ कदम यांनी उपस्थित पालकांना दिली.