अमित वाघाटे यांचा भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे सत्कार…!

⚡बांदा ता.०६-: बांदा शहरातील ग्राहकांच्या विजेच्या समस्या कर्तव्यदक्ष राहून तात्काळ सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे महावितरणचे वायरमन अमित वाघाटे यांची बढती लाईनमन म्हणून कणकवली येथे झाली आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कविटकर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बांदा उपसरपंच राजाराम धारगळकर, भाजपा शहर उपाध्यक्ष शैलेश केसरकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, सिद्धेश महाजन, बंड्या गिरप, संदीप बांदेकर, बुध अध्यक्ष संदेश सातार्डेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page