प्रवाशी अचंबित:नियमित तपासणी असल्याचे समजताच सुटकेचा उसासा
*💫देवगड दि.२९-:* बाँबशोधक नाशक पथकाची देवगड स्थानकात अचानक एन्टड्ढी झाली अन् प्रवाशी व नागरिकांमध्ये घाबरगुंडी उडाली अखेर त्यांची नियमित तपासणी असल्याचे समजल्यानंतर सर्वांनीच उसासा सोडला. लॉकडाऊन काळात सकाळच्या सत्रात गजबजाट असतानाच सिंधुदुर्ग बाँब शोधक नाशक पथकाची गाडी अचानक एस्टी स्थानक परिसरात जाते. गाडीतील श्वान, मेटल डिटेक्टर घेवून कर्मचारी उतरून संपुर्ण परिसराची तपासणी सुरू करतात या प्रकाराने स्थानकामधील प्रवाशी नागरिक काही काळ गोंधळून जातात मनात भिती येवून प्रश्न पडतो की बाँब ठेवलाय की काय? मात्र तपासणीची पुर्ण झाल्यानंतर कळते जिल्ह्यातील महत्वाचा ठिकाणी नियमित करीत असलेली तपासणी असल्याचे समजताच सर्वजण सुटकेचा निश्वास सोडतात.
