उद्या लसिकरण होणार:अधीक्षक डॉ पाटील यांची माहिती
मालवण दि-: गेले तीन दिवस मालवणच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड लसीचा साठा संपल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा स्वर उमटत असतानाच आज ग्रामीण रुग्णालयात दोनशे कोव्हीशिल्ड लसीचा डोस उपलब्ध झाला आहे. उद्या शुक्रवारी सकाळपासून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मालवणचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली. मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी २०० लसींचा डोस उपलब्ध झालेले असून उद्या शुक्रवारी सकाळी लसीकरण करण्यात येणार आहे. यात पहिला डोस, दुसरा डोस आणि आॅनलाईन नोंदणी अशाप्रकारे तीन रांगा करण्यात येणार आहेत. नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक बालाजी पाटील यांनी दिली.
