कोरोना लाॅकडाऊन कालावधीत सव्वा लाखाची उपलब्ध करून दिलीत औषधे
*💫मालवण दि.२९-:* मालवण कुंभारमाठ येथील कोविड केअर केंद्रात कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा औषधांचा साठा संपुष्टात आल्याची माहिती मालवणचे उद्योजक आणि भाजप नेते दत्ता सामंत यांनी कोव्हिडं केंद्राला भेट देऊन सुमारे सव्वा लाख रुपयांची औषधे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करीत पुन्हा एकदा आपल्यातील दातृत्व गुण दाखवून दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात भर म्हणून शासनाकडून औषधांचा साठा कमी प्रमाणात येत असून औषधां अभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. ही बाब दत्ता सामंत यांच्या पर्यंत पोहोचताच गुरुवारी सायंकाळी सुमारे सव्वा लाखांची औषधे घेऊन दत्ता सामंत यांनी कुंभारमाठचे कोविंड केअर केंद्र गाठले. यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. शासनाकडून कोविड काळातही वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानधन वेळेत दिले जात नाही, त्यामुळे वेळ पडल्यास आपण स्वतः एखादा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यास तयार आहोत, त्याचा मानधनाचा खर्च मी स्वतः उचलेन, अशी तयारी त्यांनी दर्शवली. तसेच पंचायत समितीच्या रुग्णवाहिकेसाठी चालक तुम्ही बघा, त्याचे मानधन मी स्वतः देतो, असे सांगून आपल्या तालुक्यातील रुग्ण औषधे आणि उपचारा अभावी दगवता नये, असे ते म्हणाले. यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, आरोग्य विभागाचे डॉ. बांगर, पी. डी. जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई, सेवक एल. सी. नातेवाड, मधुकर चव्हाण, घुमडे सरपंच दिलीप बिरमोळे,उमेश बिरमोळे, मंदार लुडबे, मनोज वाटेगावकर, राजू साळगांवकर आदी उपस्थित होते.
