तहसीलदार रमेश पवार यांची आक्रमक भूमिका
कणकवली : कणकवली शहरालगत कलमठ गावात सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू असलेल्या चार दुकानांवर तहसीलदार रमेश पवार यांनी दंडात्मक कारवाई केली. कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रचंड वेगाने सुरू असलेला फैलाव आणि मृत कोरोनाबाधितांची भयावह स्थिती लक्षात घेत तालुक्यात 10 दिवस कडकडीत जनता कर्फ्युबाबत आज पं स सभागृहात बैठक झाली. या बैठकीदरम्यान कलमठ गावात सकाळी 11 वाजल्यानंतर सुरू असलेल्या दुकानांचा मुद्दा चर्चेत आला होता. जनता कर्फ्यु बाबत ची बैठक संपल्यानंतर तहसीलदार रमेश पवार यांनी कलमठ गावाला भेट दिली असता कलमठ मध्ये दोन भाजीविक्रेत्यांसह , कांदे विक्री व अन्य दुकान निर्धारित वेळेनंतर ही सुरू असलेले आढळले. तहसीलदार पवार यांनी तात्काळ चौघाही दुकानदारांवर प्रत्येकी 1 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यावेळी तहसीलदारांसोबत गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय पोळ आदी उपस्थित होते.
